'कांचन डिजिटल'तर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धा; देखावा आणि आरास असे दोन विभाग

‘कांचन डिजिटल’तर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धा; देखावा आणि आरास असे दोन विभाग

रत्नागिरी : रत्नागिरीतील कांचन डिजिटलतर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धा यंदाही आयोजित करण्यात आली आहे. यंदा स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. यंदाच्या स्पर्धेत देखावा (चलचित्र/स्थिरचित्र) आणि आकर्षक आरास असे दोन स्वतंत्र विभाग करून पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा दोन स्वतंत्र विभागात पारितोषिक देणारी जिल्ह्यातील ही पहिली स्पर्धा ठरणार आहे, अशी माहिती कांचन डिजिटलचे संचालक, प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी दिली.

गेल्या वर्षीपर्यंत स्पर्धेत देखावे व आरास या दोन्हींचा एकत्रित समावेश होता. त्यामुळे दर वर्षी परीक्षकांना सुंदर, नावीन्यपूर्ण, आकर्षक-कल्पक आरास केलेल्या गणेशभक्तांवर अन्याय होतोय, असे वाटत होते. त्यामुळे यावर तोडगा म्हणून या वर्षीपासून देखावा (चलचित्र/स्थिरचित्र ) आणि आकर्षक आरास असे दोन स्वतंत्र विभाग करून पारितोषिके देण्यात येणार आहेत. दोन्ही विभागांत प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. देखावा विभागात प्रति वर्षीप्रमाणे विशेष उल्लेखनीय, प्रोत्साहनपर आणि उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता यंदाही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कांचन मालगुंडकर यांनी सांगितले. गणेशभक्तांनी जोरदार तयारीला लागावे, असे आवाहन मालगुंडकर यांनी केले आहे.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाही सुबक गणेशमूर्ती या पारितोषिकाचा समावेश स्पर्धेत असणार आहे; मात्र स्पर्धेत सहभागी असलेल्या घरगुती सजावट करण्यात आलेल्या ठिकाणच्याच गणेशमूर्तीला हे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच हे पारितोषिक ती गणेशमूर्ती साकारलेल्या गणेश मूर्तिकाराला देण्यात येणार आहे.

स्पर्धेची नियमावली : – नावनोंदणीसाठी अंतिम तारीख – गुरुवार, दि. १० सप्टेंबर – प्रवेशिका पाठवताना देखावा (चलचित्र/स्थिरचित्र ) किंवा आकर्षक आरास यांपैकी कोणत्या विभागात सहभागी होणार याचा उल्लेख करावा. – प्रवेशिकेसोबत व्हॉट्सॅप नंबरवर देखावा किंवा आरास यांचा संपूर्ण फोटो पाठवणे बंधनकारक. तसेच सजावट व देखावा कोणता आहे ते लिहिणे गरजेचे आहे. – प्रवेशिका पाठवताना पूर्ण नाव, पूर्ण पत्ता व व्हाट्सॅप नंबर, तसेच संपर्कासाठी अन्य एक स्वतंत्र नंबर पाठवणे गरजेचे आहे. – परीक्षण मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळपासून सुरू. – गणपती आगमनाच्या दुसऱ्या अर्थात परीक्षणाच्या दिवशी सर्व स्पर्धकांची सजावट पूर्ण असणे गरजेचे आहे, याची कृपया नोंद घेणे. – गणेशमूर्ती, आरास, देखाव्यामध्ये सुबकता हवी. – पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आशय, संदेश असल्यास उत्तम. – थर्माकॉल, प्लास्टिक, फ्लेक्स आदी पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचा वापर टाळावा. – नावनोंदणीसाठी संपर्क – 9422576736 – अधिक माहितीसाठी संपर्क – 8999332757 – स्पर्धेचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांद्वारे करण्यात येईल. – परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. – स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या नियोजनासाठी कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेची कार्यकारिणी सज्ज झाली आहे. यामध्ये कांचन मालगुंडकर, मुकेश गुंदेचा, नरेंद्र पाटील, अभिजित नांदगावकर, मुकुंद विलणकर, विजय पाडावे, विजय बासुतकर, नीलेश जगताप, ओमकार पाटणकर, बाळकृष्ण चव्हाण, शकील गवाणकर, तन्मय दाते, अजिंक्य सनगरे, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर, दीपिका कुबल यांचा समावेश आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply