रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अठराव्या केंद्रीय साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील साईरत्न कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे.
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे.
कोमसापचे केंद्रीय साहित्य संमेलन येत्या २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील कवी केशवसुत स्मारक संकुलात होणार आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कोमसापचे सल्लागार आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ उपस्थित राहणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अठराव्या केंद्रीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि कार्यवाह गजानन पाटील यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

