रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे ५१३ रुग्ण आढळले. आज २६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला असून एकाच दिवशी झालेली आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे ५१३ रुग्ण आढळले. आज २६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला असून एकाच दिवशी झालेली आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत आधीच्या दोन दिवसांच्या तुलनेत काल निम्म्याने घट झाली होती. मात्र कालच्या तुलनेत आज सुमारे तिप्पट वाढ झाली आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांनी प्रथमच आज एकाच दिवशी सहाशेची संख्या ओलांडली. आज ६८५ नवे बाधित आढळले. आज ११ जणांचा मृत्यू झाला.
रत्नागिरी शहरात करोनाच्या प्रतिबंधासाठी म्हणून चाललेल्या प्रयत्नांची कार्यालये एका परीने करोनाच्या प्रसाराची केंद्रे ठरली आहेत. रॅपिड अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यांसाठी स्वॅब घेणारी केंद्रे, या चाचण्यांचे अहवाल देणारा जिल्हा रुग्णालयातील कक्ष, रत्नागिरी रेल्वे स्थानक ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांनी आज (१७ एप्रिल) सलग दुसऱ्या दिवशी पाचशेची संख्या ओलांडली. आज ५१५ करोनाबाधित आढळले, तर १६७ रुग्ण करोनामुक्त झाले. आज दहा जणांचा मृत्यू नोंदविला गेला.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांनी आज (१५ एप्रिल) प्रथमच एकाच दिवशी चारशेची संख्या ओलांडली. आज ४१७ करोनाबाधित आढळले, तर ६ रुग्णांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी ठरली.
सिंधुदुर्गनगरी : करोनाप्रतिबंधाचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी बजावले आहेत.