रत्नागिरी जिल्ह्यात नवे ५१३ करोनाबाधित, २६ जणांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे ५१३ रुग्ण आढळले. आज २६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला असून एकाच दिवशी झालेली आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे.

आज लांजा वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक १६५ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.

जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी २८, दापोली ३५, गुहागर ५, चिपळूण ६४, संगमेश्वर १९, मंडणगड १२, राजापूर ६. (एकूण १६९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १३७, दापोली १६, खेड २९, गुहागर ६०, चिपळूण ४४, संगमेश्वर ४९, राजापूर ९. (एकूण ३४४). (दोन्ही मिळून ५१३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १८ हजार ४६ झाली आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ६७५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण एक लाख १८ हजार ८३४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज ७७ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १२ हजार ८२२ झाली आहे. करोनामुक्तीचा दर कमी झाला असून तो ७१.०५ टक्के झाला आहे.

जिल्ह्यात आज २६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यात २० आणि २३ एप्रिल या कालावधीत मरण पावलेल्यांचा समावेश आहे. त्यापैकी २४ जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत, तर दोघांचा खासगी रुग्णालयात झाला. मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – संगमेश्वर ११ (२ महिला ९ पुरुष), रत्नागिरी ३ (पुरुष), चिपळूण ५ (४ पुरुष, १ महिला), दापोली ३ (२ महिला, १ पुरुष), खेड २ (एक महिला, एक पुरुष), गु – १ (पुरुष), लांजा १ (महिला). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ५२९ झाली असून मृत्युदर २.९३ टक्के आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply