रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच एकाच दिवशी सहाशेहून अधिक करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत आधीच्या दोन दिवसांच्या तुलनेत काल निम्म्याने घट झाली होती. मात्र कालच्या तुलनेत आज सुमारे तिप्पट वाढ झाली आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांनी प्रथमच आज एकाच दिवशी सहाशेची संख्या ओलांडली. आज ६८५ नवे बाधित आढळले. आज ११ जणांचा मृत्यू झाला.

आज सर्व तालुक्यांमध्ये रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक १६६ रुग्ण संगमेश्वर तालुक्यात होते.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ८७, दापोली १३४, खेड १७, चिपळूण ५४, संगमेश्वर ११७, मंडणगड ४, लांजा ११. (एकूण ४२४). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ६५, दापोली २८, खेड ३८, गुहागर ३४, चिपळूण ४१, संगमेश्वर ४९, मंडणगड ४, राजापूर २. (एकूण २६१) (दोन्ही मिळून ६८५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १६ हजार ५७४ झाली आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी एक हजार ४१२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण एक लाख १६ हजार १५७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज १४५ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या १२ हजार ३६६ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर आजही घटला असून तो ७४.६१ टक्के झाला आहे.

जिल्ह्यात आज ११ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यात १८ ते २० एप्रिल या कालावधीत मरण पावलेल्यांचा समावेश आहे. त्यापैकी १० जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत, तर एकाचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला. मृतांचा तपशील असा – रत्नागिरी, पुरुष (वय ५३, १९ एप्रिल), संगमेश्वर, महिला (५५, १९ एप्रिल), संगमेश्वर, पुरुष (६४, १९ एप्रिल), चिपळूण, पुरुष (६३, २० एप्रिल), राजापूर, पुरुष (५१, १९ एप्रिल), रत्नागिरी, महिला (६७, २० एप्रिल), संगमेश्वर, महिला ५४, २० एप्रिल), दापोली, पुरुष (८६, १९ एप्रिल), दापोली, पुरुष (७५, १९ एप्रिल), चिपळूण, पुरुष (५०, १८ एप्रिल), चिपळूण, पुरुष (६५, १८ एप्रिल). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४७५ असून मृत्युदर २.८६ टक्के आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply