रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच एकाच दिवशी चारशेहून अधिक करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांनी आज (१५ एप्रिल) प्रथमच एकाच दिवशी चारशेची संख्या ओलांडली. आज ४१७ करोनाबाधित आढळले, तर ६ रुग्णांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी ठरली.

आजही सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक १४९ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात होते.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १२६, दापोली २५, गुहागर १९, चिपळूण ११, संगमेश्वर १०९, मंडणगड २२, लांजा १६, राजापूर १०. (एकूण ३३८). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २२, दापोली १२, खेड १४, गुहागर १०, चिपळूण ८ आणि संगमेश्वर १२. (एकूण ७९) (दोन्ही मिळून ४१७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १४ हजार ३८ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार ८०७ आहे. त्यातील सर्वाधिक १३६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून त्याखालोखाल १३१ रुग्ण रत्नागिरीच्या समाजकल्याण भवनात उपचार घेत आहेत. ९६७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १३० जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ११ हजार ४२९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज आणखी कमी झाला असून तो ८१.४१ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी १०७७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख १० हजार ११९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात तीन दिवसांच्या रुग्णांचा समावेश आहे. सर्व सहा जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत झाला आहे. मृतांचा तपशील असा –
१३ एप्रिल – चिपळूण, पुरुष (वय ४५). १४ एप्रिल – दापोली, पुरुष (६२), लांजा, महिला (६२), रत्नागिरी, पुरुष (६२). १५ एप्रिल – दापोली, महिला (४५), संगमेश्वर, महिला (७५). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४२१ असून मृत्युदर २.९९ टक्के आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply