टिळक स्मारक वाचन मंदिर आणि मसापतर्फे ‘अपरान्तायन’ दृक्श्राव्य मालिका

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अपरान्तायन’ दृक्श्राव्य मालिका येत्या ७ ते १८ मार्च या कालावधीत प्रसारित होणार आहे. बोली, लोककला आणि साहित्यातून फागपंचमी ते धूलीवंदन या काळातमराठी माती आणि माणसांशी अनोखा संवाद साधणारी ही मालिका आहे.

प्रवेश शुल्क : प्लास्टिकच्या दहा बाटल्या!

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने पुण्यातील असीमित आणि अनुनाद एज्युकेशनल अँड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थांनी ‘पृथ्वीची कहाणी : माझा ग्रह – माझे घर’ या विषयावरील हे प्रदर्शन ४ व ५ मार्चला आयोजित केले आहे. प्रदर्शनाला प्रवेश शुल्क म्हणून प्लास्टिकच्या दहा बाटल्या आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वणवा लागूच नये म्हणून प्रयत्न हवेत – आमदार शेखर निकम

चिपळूण : वणव्यामुळे कोकणात मोठी हानी होते. त्यामुळे वणवा लागूच नये म्हणून प्रयत्न व्हायला हवेत, असे मत चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले.

डॉ. तानाजीराव चोरगे यांच्यामुळे साहित्यिकांची समाजाभिमुखता वाढेल – जोशी

चिपळूण : समाजाशी एकरूप झालेले साहित्यिक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेला डॉ. तानाजीराव चोरगे महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे साहित्यिकांची समाजाभिमुखता वाढेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

चिपळूणमध्ये गुरुवारी ‘कृषिभूषण’ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे यांचा सत्कार

चिपळूण : महाराष्ट्रात १९०६ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी ‘कृषिभूषण’ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे निवड झाली आहे. त्यांचा येत्या गुरुवारी (दि. २७ जानेवारी) चिपळूण येथे सत्कार करण्यात येणार आहे.

चिपळूणच्या वाशिष्ठी नदीतील गाळ तीन टप्प्यांत काढण्याचा निर्णय

रत्नागिरी : चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ तीन टप्प्यांत काढण्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. मात्र बैठकीत सुचविण्यात आलेले उपाय आणि करण्यात आलेली निधीची तरतूद पुरेशी नाही, असे मत चिपळूण बचाव समितीतर्फे व्यक्त करण्यात आले.