करोना विलगीकरण केंद्रासाठी रिमोट कंट्रोल्ड कार्टची निर्मिती

देवरूख : करोना विलगीकरण केंद्रासाठी रिमोट कंट्रोल्ड कार्टची निर्मिती आंबव (ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी बनविली आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ही कार्ट बनविण्यात आली आहे.

रत्नागिरीत १२ करोनाग्रस्त वाढले; संख्या १९५वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत आज (२७ मे) १२ रुग्णांची भर पडली आहे. सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये हे स्पष्ट झाले. दरम्यान, आज पाच विद्यार्थिनींना करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले.

सावंतवाडी तालुक्यात क्वारंटाइन तरुणाचा मृत्यू; कारण अस्पष्ट

सावंतवाडी : क्वारंटाइन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही घटना घडली. मुंबईतील मालाडहून कालच (२६ मे) आपल्या गावात आलेला हा तरुण शाळेत क्वारंटाइन होता. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. या मृत युवकाचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरीची रुग्णसंख्या १८३वर; नवे आठ करोनाबाधित सापडले

रत्नागिरी : काल रात्री (२६ मे) उशिरा आलेल्या अहवालांनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात आणखी आठ करोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १८३वर पोहोचली आहे. या आठपैकी सहा जण रत्नागिरीतील, तर दोन जण संगमेश्वरातील आहेत. रत्नागिरीतील सहा जणांपैकी चार जण रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल आहेत.

पावसाचे पाणी साठवण्याच्या किफायतशीर तंत्रांची माहिती ‘ई-बुक्स’मध्ये; पाणीवाले परांजपे यांचे लेखन

कोकणात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी काही प्रमाणात जरी साठवता आले, तरी कोकणातील काही गावांत मे महिन्याच्या अखेरीला जाणवत असलेली पाणीटंचाई दूर होऊ शकेल. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उल्हास मुकुंद परांजपे गेली १२-१५ वर्षे झटत आहेत. स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ अशा पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे तंत्र त्यांनी अनुभवातून सिद्ध केले आहे. या तंत्रांची माहिती देणारी त्यांची पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले-बुक्सवर प्रकाशित झाली आहेत.

रत्नागिरीत नव्या १४ रुग्णांची वाढ; १२ जणांना घरी सोडले; एकाचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २६ मे) सायंकाळी करोनाबाधितांमध्ये १४ जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे करोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या १७५ वर पोहोचली आहे. दरम्यान आज १२ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.