पुढील वर्षापासून जलविषयक पदवी अभ्यासक्रम : उदय सामंत

रत्नागिरी : पुढच्या वर्षापासून राज्यातील विद्यापीठांमध्ये जलविषयक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत केली.

वाशिष्ठी खाडीवरच्या मालदोलीमधील शंभर वर्षांपूर्वीच्या वैशिष्ट्यपूर्ण वारसा वास्तूत आता वृद्धांसाठी‘आनंदाश्रम!’

कोकणातल्या वाशिष्ठी खाडीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेल्या मालदोली गावात १९२० च्या आसपास उभारण्यात आलेली आणि पर्यटनात शास्त्रीय वेगळेपणा जपणारी ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही हेरिटेज वास्तू येत्या रविवारी (२४ ऑक्टोबर २०२१) वृद्धांचे ‘आनंदाश्रम’ बनून नव्याने सर्वांच्या समोर येत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूबद्दल आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल धीरज वाटेकर यांनी लिहिलेला लेख…

आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटकरिता ७ ऑक्टोबरला क्रीडा नैपुण्य चाचणी

रत्नागिरी : पुण्यातील आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्यासाठी डेरवण (ता. चिपळूण) येथे येत्या ७ ऑक्टोबरला क्रीडा नैपुण्य चाचणी घेतली जाणार आहे.

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा बँकेचे अल्प दरात कर्ज की पाच टक्के दराने?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त, व्यापारी, दुकानदार, छोटेमोठे उद्योजक आणि वाहनधारकांना अल्प दरात कर्जपुरवठा करणार असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा बँक पाच टक्के दराने कर्जपुरवठा करणार असल्याचे काल जाहीर केले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना अल्प दरात कर्ज मिळणार की, पाच टक्के दराने, याचा खुलासा होऊ शकला नाही.

प्रकोप : किती नैसर्गिक? किती मानवनिर्मित?

चिपळूणसह कोकणात पुन्हा एकदा अतिवृष्टी.. पुन्हा एकदा महापूर… पुन्हा एकदा दरडी कोसळणं… पुन्हा एकदा बचावकार्य… पुन्हा एकदा मदतकार्य.. गेली अनेक दशकं हे असं आणि असंच चालू आहे.. यावर काहीच उपाय नाही का? निसर्गाचा प्रकोप झाला तर मनुष्य काही करू शकत नाही, पण किमान मानवी चुका टाळल्या जाऊ शकत नाहीत का? प्रश्न असा आहे की या चुका टाळण्याची खरंच आपली इच्छा आहे का?

हाहाकाराची भीषण उंची गाठणारा चिपळूणचा महापूर

चिपळूण : चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पुराचा वेढा दरवर्षीच पडत असल्याने चिपळूणला महापूर नवीन नाही. मात्र यावर्षीच्या २२ जुलैच्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकाराची नवी भीषण उंची गाठली.