मिरवणुकीने पोस्टात जाऊन जवानांसाठी राख्या रवाना

चिपळूण : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल आणि सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती जागवणारा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिरवणुकीने पोस्टात जाऊन जवानांसाठी राख्या रवाना केल्या.

चिपळूणमध्ये रविवारी दोन तासांचा ‘वाचू आनंदाने’ उपक्रम

चिपळूण : चिपळूण येथे रविवारी (दि. १३ जुलै) सकाळी ८ ते १० या वेळेत ‘वाचू आनंदाने’ उपक्रमांतर्गत दोन तास मराठी भाषेतील पुस्तकांचे वाचन केले जाणार आहे.

अरण्यऋषींची चिरसमाधी! मारुती चितमपल्ली यांचे निधन

संपूर्ण आयुष्य निसर्गाला वाहून घेतल्यामुळे अरण्यऋषी अशी ओळख प्राप्त झालेले मारुती चितमपल्ली यांनी आज (१८ जून २०२५) सोलापुरात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

महापुरात नुकसान झालेले चिपळूणमधील वस्तुसंग्रहालय पुन्हा उभे; पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले उद्घाटन

लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन आज (११ मे) रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. हे वस्तुसंग्रहालय म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचा अतिशय महत्त्वाचा ठेवा असल्याची भावना डॉ. सामंत यांनी या वेळी व्यक्त केली.

रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे रविवारी चिपळूणला उद्घाटन

चिपळूण : येथील शतकोत्तर हीरक महोत्सवी लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी (दि. ११ मे) रोजी होणार आहे.

किंग ऑफ कुंभार्ली सायकल स्पर्धेत खुल्या गटात सिद्धेश पाटील विजेता

चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे आयोजित किंग ऑफ कुंभार्ली ही देशभरातील ख्यातनाम सायकल स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. स्पर्धेत खुल्या गटात सिद्धेश पाटील विजेता ठरला.