साठावी संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्चपासून रत्नागिरीत

रत्नागिरी : राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे साठावी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा येत्या १० मार्चपासून रत्नागिरीत होणार आहे. या स्पर्धेला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.

सैन्यात भरती होण्याची आवश्यकता पटवून देणारा कार्यक्रम

गोळप (ता. रत्नागिरी) येथे गोळप कट्टा नावाची सांस्कृतिक चळवळ गेली चार वर्षे सुरू आहे. चळवळीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात निवृत्त सैनिक सुरेश गवाणी यांनी सैन्यभरतीचे महत्त्व पटवून दिले.

शिवरायांचे जलव्यवस्थापन तंत्र आजही उपयुक्त – प्रमोद जाधव

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन कसे होते, याचे उदाहरण त्यांनी किल्ले बांधणीसाठी दिलेल्या आज्ञापत्रामध्ये दिसते. “आधी खडक फोडुनी तळी बांधावी” असे अज्ञापत्रच त्यांनी दिले होते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी केले.

कोकणातील कातळशिल्पे, शिवरायांचे किल्ले जागतिक वारसास्थळांच्या यादीत जाणार; ‘युनेस्को’कडून प्रस्ताव तत्त्वतः मंजूर

मुंबई : जागतिक वारसा दिनी (१८ एप्रिल) कोकणवासीयांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कोकणातील सुमारे १० हजार वर्षांपूर्वीचा वारसा असलेली कातळशिल्पे आणि छत्रपती शिवरायांनी बांधलेले सागरी व डोंगरी किल्ले यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामार्फत (ASI) सादर केलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ आणि ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्त्वत: स्वीकार करण्यात आला आहे.

रत्नागिरीतील गायक अभिजित नांदगावकरचे पहिले गीत लवकरच प्रसारित

रत्नागिरी : सध्या पुण्यात राहणारा मूळचा रत्नागिरीतील गायक अभिजित नांदगावकर याचे “केव्हा केव्हा वाटते” हे पहिले प्रोफेशनल गीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रसारित होत आहे.