रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी तिघा करोनाबाधितांचा मृत्यू; एकूण संख्या १०७०

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ जुलै) एकाच दिवशी तिघा करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर नवे २१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीतील एकूण बाधितांची संख्या १०७० झाली असून, ३६८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्गातील एकूण बाधितांची संख्या २६५ झाली असून, २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्गात कोविड-१९ टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.

… आणि मुंबईतल्या १०० वर्षांच्या आजोबांनी करोनाला हरवलं…!

मुंबईत १४ जुलै रोजी एका आजोबांना करोनावर मात केल्यावर घरी सोडण्यात आले. ते १५ जुलै २०२० रोजी आपल्या वयाची १०१ वर्षे पूर्ण करणार आहेत. अर्जुन गोविंद नारिंग्रेकर असे या आजोबांचे नाव आहे, असे आकाशवाणीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

करोना आणि ढासळती मानसिकता : १५ जुलैला ऑनलाइन संवाद

रत्नागिरी : करोना आणि ढासळत्या मानसिकतेविषयी बुधवारी (१५ जुलै) रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन केले आहे.

रत्नागिरीत दिवसभरात करोनाचे ४८ नवे रुग्ण; सिंधुदुर्गात दोन दिवसांत नवा रुग्ण नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल्स या एकाच कारखान्यातील ४० जणांना करोनाची बाधा झाल्याचे आज (१४ जुलै) स्पष्ट झाले आहे. तेथील कामगारांची तपासणी खासगी प्रयोगशाळेत करण्यात आली होती. त्याशिवाय, रत्नागिरी येथील तीन आणि लांजा येथील पाच असे दिवसभरात ४८ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ९६० झाली आहे. रत्नागिरीत दाखल असलेल्या एका करोनाबाधिताचा आज मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ३३ झाली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.

रत्नागिरीत सापडले ३५ नवे रुग्ण; एकूण संख्या ९१२; सिंधुदुर्गात २२१ जणांची करोनावर मात

रत्नागिरी : आज (१३ जुलै) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ३५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ९१२ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ६२७ जणांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२१ जणांनी करोनावर मात केली असून, सध्या ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गृह विलगीकरण सात दिवसांचे करावे; चाकरमान्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : येत्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गृह विलगीकरण १४ दिवसांच्या ऐवजी सात दिवसांचे करावे, अशी मागणी करणारे निवेदन चाकरमान्यांतर्फे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.