करोना आणि ढासळती मानसिकता : १५ जुलैला ऑनलाइन संवाद

रत्नागिरी : करोना आणि ढासळत्या मानसिकतेविषयी बुधवारी (१५ जुलै) रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन केले आहे.

करोनाच्या चार महिन्यांच्या काळात सोयीसुविधांविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले; मात्र त्यापेक्षाही जास्त नागरिकांची ढासळती मानसिकता अधिक त्रासदायक ठरत आहे. रत्नागिरीत गेल्या काही दिवसांत आत्महत्यांचे प्रमाणही वाढलेले दिसत आहे. अनेक लोक डिप्रेशनमध्ये आहेत. या सर्व समस्यांवर रत्नागिरीतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे आणि वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून १५ जुलै रोजी सायंकाळी सहा ते सात या वेळेत सर्वांशी संवाद साधणार आहेत. https://www.facebook.com/ratnagiripolice या लिंकवरून या संवादात सहभागी होता येईल.
….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply