चिपळूणच्या वाचनालयात अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

चिपळूणला पत्रकार दिनी तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण

चिपळूण : येथील शतकोत्तर हीरक महोत्सवी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने येत्या शनिवारी (दि. ६ जानेवारी) पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात येणार आहे.

पत्रकारपुळका नावापुरताच

अलीकडे नेत्यांना आपल्यावर झालेली टीका अजिबात सहन होईनाशी झाली आहे. देशातील अनेक राज्यांसह मुंबईतील काही पत्रकारांना याचा त्रास भोगावा लागला आहे. आता ते लोण रत्नागिरी जिल्ह्यातही येऊन ठेपले आहे. काही प्रमाणात यूट्यूब चॅनेलमधून विरोधी पक्षाची भूमिका पत्रकार निभावत असतात. त्यांची संख्या अगदीच नगण्य असली, तरी ते अंधारातल्या पणतीचे काम करून समाजाला प्रकाश दाखविण्याचे काम करतात. त्यांचा आवाज क्षीण असला, तरी ते आपले काम नेटाने करत असतात. मात्र त्याचाही नेत्यांना त्रास होत असतो.

पत्रकारितेची दीनता

तंत्रज्ञानातील पत्रकारितेला आवश्यक मूलभूत सोयीसुविधांसाठी आर्थिक पाठबळ असावे लागते. त्यामुळे व्यावसायिकीकरणाला पर्याय नाही. परिणामी इष्ट तेच छापणार या बोधवाक्याशी फारकत घेऊन जे विकेल, तेच छापणार किंवा जे वाचले जाईल, तेच लिहिणार, प्रसारित करणार असे पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे.

पत्रकार दिनी सत्कारमूर्तीने पत्रकार आणि पाहुण्यांनाही भारावून टाकले

रत्नागिरी : मराठी पत्रकार दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ रत्नागिरीत आज (६ जानेवारी) झाला. या समारंभातील एका सत्कारमूर्तीने यजमान पत्रकार आणि पाहुणे पोलीस अधिकारी यांनाही भारावून टाकले!