चिपळूण : येथील शतकोत्तर हीरक महोत्सवी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने येत्या शनिवारी (दि. ६ जानेवारी) पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तिघा अपरान्तपुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हयात १८५४ साली ‘जगन्मित्र’ हे पहिले वर्तमानपत्र सुरू करणारे पत्रकार कै. जनार्दन हरि आठल्ये, हिंदी वृत्तपत्रसृष्टीचे भीष्म पितामह कै. बाबूरावजी रामचंद्र पराडकर आणि तळहाती शिर घेऊन स्वातंत्र्यसमरात देहाची समिधा अर्पण करणारे क्रांतिकारक कै. गणेश गोपाळ आठल्ये या तीन ‘अपरान्त’पुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
हा कार्यक्रम वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होईल. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

