‘सतत वाचन, आनंदी-सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर मांडण्याचे ईश्वरी कार्य केले. आयुष्यभर प्रवास करून दिलेल्या व्याख्यानांतून मिळालेला पैसा बाबासाहेबांनी शिवप्रतिष्ठानकडे सुपूर्द केला. पुण्यातील आंबेगाव येथे २१ एकर जमिनीवर भव्य शिवसृष्टी निर्माण व्हावी, हे बाबासाहेबांनी आयुष्यभर उराशी बाळगलेले एक स्वप्न आहे. शिवचरित्र समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य तुमचे-आमचे सर्वांचे आहे. या कार्यातूनच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहू या,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले.
