पुणे : येथील एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेतर्फे मानसिक आजारी व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी येत्या २३ मार्च रोजी एक दिवसाचे मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मानसिक आजाराला सुरुवात झाल्यापासून कुटुंबीयांना माहितीचा अभाव, समाजाचा कलंकित दृष्टिकोन आणि या आजाराचे वेगळेपण यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. या आजारामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची भावना अनेकांच्या मनात असते.
या सर्व पार्श्वभूमीवर वेळीच माहिती, शंकानिरसन आणि आवश्यक त्या कौशल्यांची जोपासना करणे आवश्यक असते. हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून कुटुंबीयांसाठी एक दिवसाचे शिबिर एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. प्राज फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्याने २३ मार्च रोजी पुण्याच्या एस. एम. जोशी हॉलमध्ये हे शिबिर होणार आहे.
एकूण चार सत्रांमध्ये होणाऱ्या या शिबिरात रुग्णाशी कसे वागावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, इमर्जन्सी कशी ओळखावी, लग्नासंबंधीचा निर्णय केव्हा घ्यावा, रुग्णामध्ये दीर्घकालीन सुधारणा होण्यासाठी काय करावे, अशा विविध गोष्टींशी संबंधित ऊहापोह होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ. अरुण रुकडीकर संपूर्ण शिबिर घेणार आहेत.
एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ संस्थेविषयी अधिक माहिती सोबतच्या लिंकवर –

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

