विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आज (२७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातल्या लक्ष्मी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आज (२७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातल्या लक्ष्मी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातल्या गणपतीपुळे येथे आज (२५ डिसेंबर) विभाग आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
जगातील आठवे आश्चर्य आणि सर्वांत मोठे मंदिर असलेल्या कंबोडियातील अंगकोरवाट परिसरामध्ये नुकतेच विश्व मंदिर परिषदेद्वारा पहिल्यावहिल्या विष्णू भागवतकथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामजन्मभूमी न्यास अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या अमृतमय वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडीपासून अक्कलकोटपर्यंतची मनोरथपूर्ती पदयात्रा दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी, १३ डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात होणार आहे.
रत्नागिरी : ‘सर्वोदय छात्रालय अमृत महोत्सव साजरा करत आहे. छात्रालयाला शासकीय अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचा खर्च, दत्तक-पालक योजना, गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विद्यासंकुल विकसित करण्याचा संकल्प केला आहे. याकरिता माजी विद्यार्थी आणि समाजातील जास्तीत जास्त दानशूरांनी मदत करावी,’ असे आवाहन यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान व्यवस्था समितीचे सदस्य हरिश्चंद्र गीते यांनी रविवारी (१० डिसेंबर) रत्नागिरीत केले.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (९ डिसेंबर) देशभरातल्या विविध ठिकाणच्या नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशभरात फिरणार आहे.