काटवलीतील सुजित जाधवची ‘स्पेन’भरारी!

मेडिकल, इंजिनीअरिंग, कम्प्युटर अशा रूढ क्षेत्रांमध्ये शिक्षण घेतले आणि आपण शहरी भागात असलो, तरच करिअरमध्ये उंच भरारी घेता येते, असा एक सर्वसाधारण समज आहे; मात्र रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील काटवली या छोट्याशा गावातील सुजित जाधवने या समजाला छेद देणारी उत्तुंग कामगिरी केली आहे.

कुपोषित बालकांना पोषक आहार देण्याचा आणि पालकत्व घेण्याचा निर्णय

‘कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद अग्रेसर असून, आगामी काळात विविध उपाययोजनांच्या माध्यमातून हे प्रमाण शून्यावर आणून राज्यामध्ये आदर्श निर्माण केला जाईल,’ असं राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितलं.

मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर वृक्षारोपणाचा प्रारंभ

मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा प्रारंभ आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

रत्नागिरीत ५८ हजारांहून अधिक बालकांना दिला जाणार पोलिओ लशीचा डोस

रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते बालकाला पोलिओ लशीचा डोस पाजून आज रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण

‘अनबॉक्स’कडून वर्धापनदिनानिमित्त पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट

रत्नागिरीतील ‘अनबॉक्स युअर डिझायर’ या फूड डिलिव्हरी उद्योगाचा सहावा वर्धापनदिन नुकताच झाला. त्या निमित्ताने, ‘अनबॉक्स’तर्फे रत्नागिरी पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट देण्यात आली.

रत्नागिरीत क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दहावी-बारावीतील गुणवंतांचा सन्मान

‘दहावी-बारावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असते. आजची कौतुकाची थाप म्हणजे पुढच्या आयुष्याची शिदोरी आहे. आता शिक्षणाच्या शाखा विस्तारल्या असून, तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडू शकता येईल. जे क्षेत्र निवडाल त्यातील परिपूर्ण ज्ञान घ्या. दहावी-बारावीचे शिखर शेवटचे नसून, आता खऱ्या अर्थाने नवे प्रवेशद्वार उघडले आहे,’ असे प्रतिपादन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले.

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहावी, बारावीतील गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.