साप्ताहिक कोकण मीडियाच्या १० एप्रिल २०२०च्या अंकाचे संपादकीय…

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १० एप्रिल २०२०च्या अंकाचे संपादकीय…
करोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात नागरिकांना शासनाच्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी काम करत आहेतच, पण कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पूर्णपणे सेवावृत्तीने तीनशे हात प्रशासनाला मदत करत आहेत. जीवनावश्यक वस्तू घरोघरी पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक संस्था काम करत आहेत.
व्हॉट्सअॅपवरच्या एका मेसेजवर धामापूर तर्फ संगमेश्वर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील २२ अपंगांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत रत्नागिरीतून पाठविण्यात आली.
रत्नागिरी : रत्नागिरीच्या एमआयडीसीत अडकून पडलेल्या दोनशे तामिळी तरुणांची भोजनाची व्यवस्था रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, तर त्यांच्याकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना आलेल्या ट्विटर संदेशाची त्वरित दखल घेऊन मुंढे यांनी ही व्यवस्था केली.
संपूर्ण जग व्यापून टाकणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात आणि अगदी ग्रामीण पातळीवरही प्रत्येक जण आपापल्या परीने हे प्रयत्न
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाउन आहे; मात्र या कालावधीत खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम सुरू ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरू ठेवावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी करण्यात आली आहे.