प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ मिळणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ मिळणार आहे.
रत्नागिरी : कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि सुपारी बागायतदारांचा मेळावा रावारी (ता लांजा) येथे झाला. त्यातून सुपारी बागेचे व्यवस्थापन आणि उत्पादनात होणारी घट थांबविण्याच्या दृष्टीने व्यापक विचारमंथन झाले.
राजापूर : एसटीने आंब्याची वाहतूक सुरू केल्याचा फायदा रायपाटण (ता. राजापूर) येथील शेतकरी समूहाला झाला. मालवाहतुकीच्या एकाच ट्रकमधून साडेतीन टन म्हणजे एक हजार डझन हापूस आंबा सोमवारी (ता. २५ मे) थेट औरंगाबादला रवाना झाला.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येत्या २३ एप्रिलपासून हापूस आंब्याची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे करोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.
रत्नागिरी : आंब्यासारख्या नाशिवंत मालाच्या वाहतुकीची व्यवस्था कोकण रेल्वेमार्फत केली जाणार असून, त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. करोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाउन असल्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हापूस आंब्यासारख्या हंगामी पिकावर कोकणाचे अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे या सेवेचा मोठा उपयोग होणार आहे.