आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात रंगणार अरुण इंगवलेंची मुलाखत

तळवडे (ता. राजापूर) : येथे राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात चिपळूण येथील नामवंत कवी, बोलीभाषांचे अभ्यासक आणि समीक्षक अरुण गजानन इंगवले यांची विशेष मुलाखत शनिवारी (दि. ११ फेब्रुवारी) दुपारनंतरच्या ‘साहित्यविचार’ सत्रात पत्रकार-लेखक धीरज वाटेकर इंगवले यांची मुलाखत घेणार आहेत.

पुस्तकांशिवाय भवितव्य नाही – प्रकाश देशपांडे

अलोरे (ता. चिपळूण) : पुस्तकांशिवाय भवितव्य नाही. आपापसातील मतभेद मिटवायचे असतील, किल्मिषे दूर करायची असतील, तर पुस्तकांशिवाय दुसरा मार्ग नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे यांनी केले.

दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानच्या मास्टर डिग्रीसाठी चिपळूणच्या प्रज्ञा इंगवलेची निवड

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानच्या संग्रहालय विज्ञान मास्टर डिग्री कोर्ससाठी चिपळूणमधील प्रथितयश कवी, बोलीभाषा अभ्यासक आणि समीक्षक अरुण गजानन इंगवले यांची कन्या प्रज्ञा इंगवले हिची निवड झाली आहे.

अशा रंगल्या बोली-गजाली (व्हिडिओ)

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१९च्या दिवाळी अंकात घेतलेल्या बोलीभाषा कथा स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा सोहळा २९ फेब्रुवारी २०२० रोजी रत्नागिरीत पार पडला. या निमित्ताने बोली-गजाली हा अनौपचारिक गप्पांचा फड रंगला. ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर आणि संगमेश्वरी बोलीतील नामवंत लेखक गिरीश बोंद्रे यांनी आपापल्या बोलींत केलेल्या गावाकडच्या गजालींनी कार्यक्रम रंगत गेला.