उद्यापासून एसटीची सेवा पूर्ण आसनक्षमतेने सुरू होणार

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसमधून सध्या निम्म्या क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू होती. १८ सप्टेंबर २०२०पासून पूर्ण आसन क्षमतेने एसटी वाहतूक सुरू केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

२० ऑगस्टपासून एसटीच्या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार; नियम पाळणे बंधनकारक

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेले पाच महिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची अर्थात एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

चाकरमान्यांना सवलतीत एसटी उपलब्ध करून द्यावी : आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण : गणेशोत्सवाकरिता मुंबई आणि परिसरातून कोकणासह राज्यभरात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात एसटीची बससेवा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन कल्याण ग्रामीण विभागाचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना कोकणवासीयांच्या वतीने दिले आहे.

२२ मेपासून रत्नागिरी जिल्ह्यात ५२ एसटी धावणार; रेल्वे आरक्षणही सुरू

रत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मेपासून शिथिलता जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ३२ मार्गांवर ५२ गाड्या २२ मेपासून धावणार आहेत. एसटीच्या विभागीय कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली. प्रवाशांच्या मागणीनुसार या गाड्या धावणार आहेत.

मोफत एसटी प्रवासाबाबत दिशाभूल सुरूच…

मोफत एसटी प्रवासाबाबत परिवहन मंत्री म्हणजेच सरकार लोकांची दिशाभूल करत आहे!