रत्नागिरीच्या चित्पावन ब्राह्मण संघाचा श्रावण कीर्तन सप्ताह यंदा सात ठिकाणी

गेली १३ वर्षे रत्नागिरीमध्ये श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे केले जात आहे. दर वर्षी मंडळाच्या सभागृहात होणारा कीर्तन सप्ताह यंदा वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे.

वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासव जन्मोत्सवाची चाहूल

मंडणगड : वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनारी १५ नोव्हेंबर रोजी कासवमित्र देवेंद्र पाटील यांना वाळूमध्ये ऑलिव्ह रिडले सागरी कासवाचे या हंगामातील पहिले घरटे आढळले. त्यामुळे कासवाच्या जन्मोत्सवाची चाहूल लागली आहे. दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे यांनी वेळास येथील कासवमित्रांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

इतिहास संशोधक, पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांचे निधन

चिपळूण : कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर (वय ९३) यांचे चिपळूणमधील ‘अपरान्त’ हॉस्पिटलमध्ये काल (११ ऑक्टोबर २०२२) रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी हृदयविकाराने निधन झाले.

वेत्ये समुद्रकिनाऱ्यावर यावर्षी सर्वप्रथम उमटणार कासवांची पाउले

राजापूर : ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे आज वेत्ये (ता. राजापूर) येथे कासवाची ६१ अंडी आढळून आली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात या किनाऱ्यावर जिल्ह्यात सर्वप्रथम कासवांची पावले उमटणार आहेत.

रत्नागिरी : श्रीलंकेच्या पाहुण्यांचे मुंबईतील पाहुण्यांना कोकणात दर्शन

रत्नागिरी : श्रीलंकेतून कोकणात आलेल्या ‘ओडिकेफ’ पक्ष्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि गुहागर परिसरात आलेलेल्या मुंबईतील पक्षीप्रेमींना दर्शन घडले.

तौते चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात

रत्नागिरी : अरबी समुद्रात सुरू झालेले तोक्ती चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या जवळून समुद्रातून गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून वादळाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.