दापोली विंटर सायक्लोथॉनमधील सायकली सातारा, दापोलीतील स्वारांनी जिंकल्या

दापोली : येथे आज आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेतील सोडतीमध्ये कोरेगाव (सातारा) येथील अनिकेत मोहाळे आणि दापोलीमधील अनिशा लयाळ यांनी दोन सायकली जिंकल्या.

बाबू घाडीगावकर यांना काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार

दापोली : कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि दापोलीतील उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगावकर यांना काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार सोलापूर येथे प्रदान करण्यात आला.

दापोलीत सायकल फेरीने लुटला दिवाळीतील किल्ले पाहण्याचा आनंद

दापोली : दिवाळीच्या निमित्ताने साकारलेले किल्ले पाहण्यासाठी आज दापोली सायकलिंग क्लबने सायकल फेरी काढली. त्यातून अनेकांनी किल्ले पाहण्याचा आनंद लुटला.

दापोलीत ६ नोव्हेंबरला विंटर सायक्लोथॉन, सोडतीत लाखाची बक्षिसे

दापोली : येथे येत्या ६ नोव्हेंबर रोजी विंटर सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यातील सोडतीत १ लाखाची बक्षिसे, २ सायकल आणि खूप काही जिंकण्याची संधीही सायकलपटूंना मिळणार आहे.

देवरूख निगुडवाडीतील ‘आराधने’ची आगळीवेगळी परंपरा

रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवरूखजवळच्या निगुडवाडीत पूर्वीच्या काळी गावकरी एकत्र येऊन गावात कोणतीही रोगराई येऊ नये यासाठी ग्रामदेवतांकडे आराधना करीत, प्रार्थना करीत, विनंती करीत. ती आराधना पद्धत आजही सुरू असून, या आगळ्यावेगळ्या परंपरेबद्दल शांताराम गोरुले यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

केळशीचा रथोत्सव आणि पलित्यांचा नाच

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या केळशी गावात हनुमान जयंतीला होणारा श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव आणि गणेशोत्सवात माहेरवाशीण गौराईला मानवंदना देण्यासाठी पेटलेला पलिता हाती घेऊन ढोल-सनईच्या तालावर श्रीकालभैरवाच्या साक्षीने रंगणारा सामूहिक पलित्यांचा नाच हे दोन्ही प्रकार आगळेवेगळे आहेत. चिपळूणमधील लेखक, पत्रकार धीरज वाटेकर यांनी त्याबद्दल लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.