आडिवऱ्याच्या श्री महाकालीचे वैशिष्ट्यपूर्ण उत्सव

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री महाकाली देवीचा वार्षिक नवरात्रोत्सव आणि होलिकोत्सव तालुक्यातील सर्वांत मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्याबद्दल, तसंच मंदिराबद्दलच्या आख्यायिकांबद्दल माहिती देणारा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात सदानंद पुंडपाळ यांनी लिहिलेला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

१६२ वर्षांची परंपरा असलेला पिरंदवण्यातला गोकुळाष्टमी उत्सव

रत्नागिरी तालुक्यातल्या सड्ये-पिरंदवणे-वाडा जून या गावांमधल्या सुमारे ७०० वर्षं जुन्या असलेल्या श्री सोमेश्वर मंदिरात गेली १६२ वर्षं गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. गोफ, टिपऱ्यांसारखे पारंपरिक खेळ हे या उत्सवाचं वैशिष्ट्य. साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात अनिकेत कोनकर यांनी लिहिलेल्या त्याविषयीच्या लेखाची ही एक छोटी झलक.

चिंदर गावच्या श्री देवी भगवती माउलीची दिंडेजत्रा!

चिंदर (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) या गावातील श्री देवी भगवती माउलीच्या दिंडेजत्रेबद्दल विवेक (राजू) परब यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखाची ही छोटीशी झलक…

उत्सवातली खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करणारं कुर्धे गाव

सुमारे ५० वर्षांपूर्वी काही कारणाने खंडित झालेली उत्सवातल्या टिपऱ्यांच्या खेळाची परंपरा पावसजवळच्या कुर्धे गावाने यशस्वीरीत्या पुनरुज्जीवित केली आहे. त्यात तरुणांचा मोठा सहभाग आहे. साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात अनिकेत कोनकर यांनी लिहिलेल्या त्याविषयीच्या लेखाची ही एक छोटी झलक.

उत्सवप्रेमापोटी उभारलेले श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर

सर्वसाधारणपणे आधी मंदिर उभारले जाते आणि तेथे नंतर उत्सव साजरा केला जातो; पण मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथे आधी उत्सव साजरा होऊ लागला आणि नंतर तेथे श्री लक्ष्मीपल्लीनाथाचे भव्य-दिव्य मंदिर उभारले गेले. यातून कोकणात उत्सवप्रियता किती आहे हे दिसून येते. ‘आधी कळस, मग पाया’ या अभंगाचेच जणू हे उदाहरण आहे.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात उमेश आंबर्डेकर यांनी लिहिलेल्या लेखाची ही एक छोटी झलक.

वाटूळचा शिमगोत्सव

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या वाटूळ या गावातला शिमगोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. या शिमगोत्सवाबद्दल विराज विलास चव्हाण यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.