रत्नागिरी तालुक्यातल्या सड्ये-पिरंदवणे-वाडा जून या गावांमधल्या सुमारे ७०० वर्षं जुन्या असलेल्या श्री सोमेश्वर मंदिरात गेली १६२ वर्षं गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. गोफ, टिपऱ्यांसारखे पारंपरिक खेळ हे या उत्सवाचं वैशिष्ट्य. साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात अनिकेत कोनकर यांनी लिहिलेल्या त्याविषयीच्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
निसर्गदेवतेचं वरदान लाभलेल्या कोकणातली एकाहून एक देखणी आणि मनःशांती देणारी मंदिरं पाहिली, की कोकणाला देवभूमी का म्हणतात, याचं कारण वेगळं शोधावं लागत नाही. अशा या वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेशावरचा कोकणी माणूस भक्तिरसाने ओथंबलेला नसता, तरच नवल. त्याच्या या भक्तिभावाला उत्सवप्रियतेची जोड मिळाली आणि वेगवेगळ्या उत्सवांची सुरुवात झाली. कोकणातल्या अनेक गावांमधल्या उत्सवांना १००-१५० किंवा त्याहून जास्त वर्षांची परंपरा आहे. काळानुसार काही बदल झाले असले, तरी ही वैभवशाली परंपरा आजही त्याच भक्तिभावाने जोपासली जात आहे, हे महत्त्वाचं.
रत्नागिरी तालुक्यातली सड्ये-पिरंदवणे- वाडा जून ही अशीच वैभवशाली परंपरा जपणारी गावं. रत्नागिरीतून कोतवड्याला जायच्या मार्गावर कोतवड्याच्या जवळ ही तीन गावं एकमेकांना लागून वसलेली आहेत. त्यातल्या मध्यवर्ती ठिकाणी पिरंदवणे गावात श्री सोमेश्वराचं पुरातन मंदिर आहे. त्या मंदिराचा नेमका इतिहास ज्ञात नाही; मात्र ते किमान ६०० ते ७०० वर्षं जुनं असावं, असा अंदाज आहे.

या मंदिरात आजही वर्षभर वेगवेगळे उत्सव साजरे होत असतात आणि ते पारंपरिक पद्धतीने साजरे होतात, हे महत्त्वाचं. त्यातला गोकुळाष्टमी उत्सव एकदम वैशिष्ट्यपूर्ण असून, यंदा (२०२२) त्या उत्सवाला १६२ वर्षं पूर्ण झाली. अलीकडे गोकुळाष्टमीच्या उत्सवात प्रखर लाइटच्या झगमगाटात डीजेच्या तालावर केलं जाणारं चित्रविचित्र नृत्य आणि धांगडधिंगा असं चित्र अनेक ठिकाणी दिसतं. काही गावांमध्येही हे लोण हळूहळू पसरू लागलं आहे; मात्र तरीही अनेक गावांत आजही उत्सवात परंपरागत सुरांचं आणि सात्त्विक उत्साहाचं लेणं अनुभवायला मिळतं. सड्ये-पिरंदवणे-वाडा जून या गावांतला उत्सवही त्या सध्या दुर्मीळ झालेल्या उत्सवांपैकीच एक. ग्रामदैवत श्री सोमेश्वराच्या मंदिरात होणाऱ्या या गोकुळाष्टमी उत्सवातून गोफ, टिपऱ्या यांसारख्या पारंपरिक खेळांसह जुन्या गाण्यांचा वारसा या गावाने जपून ठेवलाय. त्यामुळे हा उत्सव वेगळीच अनुभूती देतो.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.) (या उत्सवाची झलक दर्शविणारे व्हिडिओ शेवटी दिले आहेत.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

