केंद्रीय विश्वविद्यालयातर्फे रत्नागिरीत संस्कृत शिकण्याची संधी

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय आणि येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे संस्कृत प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार असून रत्नागिरीकरांसाठी उत्तम संधी प्राप्त झाली आहे.

नवी दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे (पूर्वीचे राष्ट्रीय संस्कृत संस्थान) अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सुरू आहे. केंद्राचे यावर्षीचे सातवे वर्ष आहे. गेली सहा वर्षे सुमारे ६०० जणांनी या केंद्राचा लाभ घेतला आहे. या केंद्रामध्ये संस्कृत शिकण्याची संधी सर्वांना मिळणार असून यात किमान दहावी उत्तीर्ण झालेले संस्कृत शिकण्याची इच्छा असलेले विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, डॉक्टर अशी कोणीही जिज्ञासू व्यक्ती प्रवेश घेऊ शकते. यासाठी संस्कृतचे पूर्वज्ञान आवश्यक नाही. या अभ्यासाक्रमांतर्गत सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी अभ्यासक्रम तयार केलेला असून संस्कृत श्रवण, संभाषण, वाचन, लेखन अशा भाषाकौशल्यांचे अध्ययन केले जाते.

केंद्रामध्ये प्रथम प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी संस्कृतभाषा प्रमाणपत्रीय पाठ्यक्रम चालविला जातो. याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आठवड्यातून ३ किंवा ४ दिवस रोज एक तास वर्ग होतील. प्रवेश घेतलेल्यांच्या सोयीनुसार सकाळी, दुपारी किंवा सायंकाळी वर्गाची वेळ निश्चित केली जाईल. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी मे २०२३ पर्यंत आहे. प्रवेश घेण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२२ आहे. इच्छुकांनी संस्कृत विभाग, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी क्रमांक डॉ. कल्पना आठल्ये : ७७२००३२३०२ , श्री. विशाल प्रसाद : ९७५६०७६९६५, श्री. जयंत अभ्यंकर : ८३९०८७५९१८, श्रीमती स्नेहा शिवलकर : ७२६४९१९३१४

या केंद्रामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी सोबत दिलेल्या लिंकवरून गुगल फॉर्ममध्ये आपली माहिती द्यावी.
https://forms.gle/AogJombjy99u2tC66


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply