रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री महाकाली देवीचा वार्षिक नवरात्रोत्सव आणि होलिकोत्सव तालुक्यातील सर्वांत मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्याबद्दल, तसंच मंदिराबद्दलच्या आख्यायिकांबद्दल माहिती देणारा लेख साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात सदानंद पुंडपाळ यांनी लिहिलेला आहे. त्या लेखाची ही एक छोटी झलक.
…..
रत्नागिरीपासून ३६ किलोमीटर व राजापूरपासून २६ किलोमीटर अंतरावर असलेल्या राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री महाकाली देवीचा वार्षिक नवरात्रोत्सव आणि होलिकोत्सव तालुक्यातील सर्वांत मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. असे सांगितले जाते, की इसवी सनाच्या अकराव्या शतकाच्या दरम्यान आडिवरे येथे जैन समाजाचे वर्चस्व होते. श्रीमत शंकराचार्य धर्मप्रसारार्थ इथे आले असताना जैन मताचे खंडण करून इ. स. १३२४ च्या सुमारास येथे श्री महाकाली देवीची प्रतिष्ठापना केली असे मानण्यात येते. तिच्याच शेजारी श्री योगेश्वरीचीही मूर्ती आहे. श्री महाकाली मंदिराच्या प्राकारातच श्री महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, रवळनाथ आणि नगरेश्वर यांचे पंचायतन आहे. श्री महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी या तीन भगिनी एकत्र असल्यामुळेच हे मंदिर करवीर निवासिनी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाबाई मंदिरासारखेच महत्त्वपूर्ण मानले जाते.

श्री महाकाली देवीचा नवरात्रोत्सव हा तालुक्यातील सर्वांत मोठा उत्सव मानण्यात येतो. त्यामुळेच तालुक्याबरोबरच बाहेरील भाविकही इथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात. नवरात्रात या परिसरात जत्रा भरते. आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमीला वाडापेठमधील जुनगरी यांच्या घराजवळ असलेल्या आपट्याच्या झाडाचे सोने विधिवत लुटण्यासाठी देवीचे सारे मानकरी, अब्दागिरीसह मालदार, चोपदार आणि भाविक वाजतगाजत जातात. तिथे भटजींच्याहस्ते विधिवत पूजा करण्यात येते. मग मानकरी आणि भाविक तेथील सोने लुटतात आणि ‘सोने घ्या, सोन्यासारखे राहा’ असा एकमेकाला प्रेमाचा संदेश देतात. श्री महाकाली देवीचा नवरात्रोत्सव दिमाखदार असतोच; पण होळी उत्सवही तितकाच रंगतदार आणि कोकणच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा आहे.
१९४२च्या ‘चलेजाव- छोडो भारत’ आंदोलनाच्या वेळी देशावरच्या स्वातंत्र्यसैनिकांनी या देवीला कौल लावूनच खजिना लुटला होता असे सांगतात. चीन युद्धाच्यावेळी देवस्थान मंडळाने भारत सरकारला सोने दिले होते, असेही सांगण्यात येते.
संपूर्ण लेख वाचा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात… (अंक घरपोच मागवण्यासंदर्भात, तसेच अंकाच्या अंतरंगासंदर्भात माहिती पुढे दिली आहे.)
स्पर्धेतले विजेते लेख, अन्य लेख, चित्रं आदी साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आलं आहे. या अंकात पालघर ते सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतल्या वेगवेगळ्या दैवतांच्या उत्सवांबद्दलच्या एकूण ३४ सुंदर लेखांचा खजिना आहे. त्याशिवाय कथा, कविता, व्यंगचित्रं आदी फराळही आहेच. एकंदरीतच हा अंक संग्राह्य आणि कोकणाबद्दलच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. या अंकातून वाचनानंद तर मिळेलच; पण पर्यटकांना वेगवेगळ्या मंदिरांची माहितीही मिळू शकेल.
पृष्ठसंख्या : १००
मूल्य : १५० रुपये
9850880119 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवल्यास अंक घरपोच पाठवला जाईल.
मुंबई, पुणे, रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली, लांजा येथील प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध.
ई-बुक खरेदीसाठी लिंक :
गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ
मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536
बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78 (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
अक्षरधारा – https://akshardhara.com/38761-diwali-ank.html (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)
पायल बुक्स – https://bit.ly/3VTmRyl (ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी)


विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

