खेडशी नाका येथे साकारली रत्नदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती; पौर्णिमेपर्यंत पाहता येणार

रत्नागिरी : खेडशी नाका (ता. रत्नागिरी) येथील तरुणांनी दिवाळीच्या निमित्ताने रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्याची मोठी प्रतिकृती साकारली आहे. येत्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

‘‘मोडीदर्पण’मुळे घडतील मोडी लिपीचे नवे अभ्यासक’

मुंबई : ‘विस्मृतीत गेलेल्या मोडी लिपीला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये आणि नवे मोडी अभ्यासक घडविण्यासाठी मोडीदर्पण दिवाळी अंक महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असे प्रशंसोद्गार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोडीदर्पण दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी काढले.

दिवाळीसाठी रत्नागिरीतील कोविड सेंटर्स रोषणाईने नटली; रुग्णांसाठी प्रशासनाची व्यवस्था

रत्नागिरी : करोनाची बाधा झाल्याने रत्नागिरीत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आज (१४ नोव्हेंबर) रुग्णालयात राहूनही दिवाळीचा आनंद लुटता आला. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यासाठी खास व्यवस्था केली होती.

कोकण मीडियाचा पाचवा दिवाळी अंक प्रकाशित; करोना कथा स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक कोकण मीडियाच्या पाचव्या दिवाळी अंकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन आज (१३ नोव्हेंबर २०२०) रत्नागिरीत झाले. करोनाविषयक कथा स्पर्धाही कोकण मीडियाने या दिवाळी अंकाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आली होती. त्या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

फिनोलेक्स, ‘मुकुल माधव’मुळे १७०० कुटुंबांची दिवाळी होणार आनंदमय

मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने समाजातील १७०० गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे.

दिवाळीनिमित्त दिव्यांगांच्या कलाविष्कारात लॉकडाउनमध्येही खंड नाही; ‘आविष्कार’च्या वस्तू विकत घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : गेले काही महिने करोना आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व शाळा बंद आहेत. या काळात सामान्य विद्यार्थ्यांच्याच शिक्षणाची अडचण झाली आहे, तिथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणींची कल्पनाच केलेली बरी; मात्र रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील श्यामराव भिडे कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मात्र या कठीण काळातही आपली परंपरा राखली आहे.