पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधण्याकरिता जलवर्धिनी प्रतिष्ठान करणार मदत

मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने फेरोसिमेंटच्या जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान कोकणातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. श्रमदानातून टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी काही साहित्य, तसेच तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी दिली.

जलदिनानिमित्ताने जलबोध केंद्राचा प्रारंभ

मुंबई : बुधवारी (दि. २२ मार्च) जागतिक जलदिन आणि गुढी पाडवा आहे. त्यानिमत्ताने मुलुंड (मुंबई) येथे जलबोध केंद्राचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

जलवर्धिनीच्या पर्जन्य जलसाठवण उपक्रमाची सुरेश प्रभूंकडून दखल

रत्नागिरी : मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने गेल्या काही वर्षांपासून कोकणासह विविध ठिकाणी राबविलेल्या पावसाचे पाणी साठवण्याच्या उपक्रमाची माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेतली आहे. हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

पावसाचे पाणी साठविण्यासाठी जलवर्धिनीचा मदतीचा हात

रत्नागिरी : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या जलशक्ती अभियानाला आणि राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या जलजागृती उपक्रमाला प्रतिसाद म्हणून मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने फेरोसिमेंटच्या जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. श्रमदानातून टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी बांधकाम साहित्य तसेच तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

light art water space

पावसाचे पाणी पालथ्या घड्यावर

#RainwaterHarvesting #पर्जन्यजलसंचय

पाण्याचा उपसा करण्यासाठी विहीर खोदण्याकरिता अल्पदराने कर्ज मिळते, अनुदानही मिळते. पण पाणी साठविण्याकरिता अशी कोणतीच योजना नाही. तशी ती करावी, असेही कुणाला सुचलेले नाही. ते सुचले असते, तर प्रत्येक घर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकले असते. वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला अल्पप्रमाणात का होईना, पण अटकाव झाला असता.

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १५ एप्रिल २०२२ रोजीच्या अंकाचे संपादकीय वाचा पुढील लिंकवर…

कर्जत येथे २३ नोव्हेंबरला जल माहिती केंद्र मार्गदर्शन

कर्जत (जि. रायगड) : कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पाणी प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने जल माहिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राचाच प्रारंभ येत्या मंगळवारी (दि. २३ नोव्हेंबर) माऊली सभागृह (शिवाजीनगर, दहिवली-कर्जत) येथे होणार आहे.