झटपट पत्रकारितेत समाजाचे प्रतिबिंब उमटत नाही; ‘दर्पण’ पुरस्कार वितरणप्रसंगी वसंत भोसले यांचे प्रतिपादन

राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्‍या राज्य पातळीवरील प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण वसंत भोसले यांच्या हस्ते पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात करण्यात आले. त्या वेळी भोसले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, पोंभुर्ले गावचे उपसरपंच प्रदीप फाळके, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

चिपळूण वाचनालयाच्या सभागृहाला बाळशास्त्री जांभेकरांचे नाव

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या नव्याने अद्ययावत होणाऱ्या सभागृहाला ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याचा निर्णय वाचनालयाने घेतला आहे.

मुंबईत बाळशास्त्री जांभेकरांचे स्मारक उभारण्याची मागणी

मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक `दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईतील काळबादेवी भागात भव्य राष्ट्रीय स्मारक राज्य शासन व मुंबई महापालिकेने उभारावे. तसेच मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र होणाऱ्या विद्यापीठाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ असे नाव द्यावे, अशी मागणी करणारा विशेष ठराव महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाने केला आहे.

बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकासाठी निधी जाहीर झाल्याने समाधान

सिंधुदुर्गनगरी : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे राज्यातील पहिले स्मारक बाळशास्त्री यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याचे आज जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. त्याबद्दल पोंभुर्ले येथे सर्वप्रथम स्मारक उभारणाऱ्या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेने समाधान व्यक्त केले आहे.

दर्पणकारांच्या पत्रकारितेचा वारसा जतन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, २० फेब्रुवारी रोजी त्यांना विनम्र अभिवादन केले. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा वसा आणि वारसा प्रय़त्नपूर्वक जतन करू या’, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

`दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव शासकीय अभिवादन यादीत समाविष्ट

मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक `दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट केले आहे. त्यानुसार येत्या शनिवारी (२० फेब्रुवारी) बाळशास्त्री जांभेकर यांच्या २०९ व्या जयंतीदिनी शासकीय कार्यालयांमध्ये बाळशास्त्रींना अभिवादन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.