बॅ. नाथ पै जन्मशताब्दी : खासदार राऊतांकडून सिंधुदुर्गातील १३० वाचनालयांना ‘सिंधुसाहित्यसरिता’ची भेट

बॅ. नाथ पै यांची जन्मशताब्दी नुकतीच २५ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, सिंधुसाहित्यसरिता हे पुस्तक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १३० वाचनालयांना भेट पाठवण्याचा निर्णय खासदार विनायक राऊत यांनी घेतला आहे.

कुशेवाडा ग्रामपंचायतीला पंधरा लाखाचे स्वच्छता बक्षीस प्रदान

सिंधुदुर्गनगरी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कुशेवाडा (ता. वेंगुर्ले) ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पंधरा लाखाचे बक्षीस प्रदान करण्यात आले.

वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल

शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारी २०१८ रोजी वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षांत रुग्णालय पूर्ण होऊन रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आणि त्याचे उद्घाटन आता मुख्यमंत्री झालेले तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने रुग्णालयातील सोयीसुविधांचा आढावा.

मालवणचे मामा : नाट्यकार भार्गवराम विठ्ठल वरेरकर

उपेक्षितांच्या अंतरंगांना रंगभूमी देणारे नाट्यकार पूजनीय भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा आज (२७ एप्रिल) जन्मदिन. त्या निमित्ताने, आचरे (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला, त्यांचे वेगवेगळे पैलू उलगडणारा हा लेख …

सिंधुसाहित्यक्षेत्रीचे परशुराम… प. स. देसाई

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम राबवण्यात आला. ती लेखमाला सत्त्वश्री प्रकाशनातर्फे पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आली. त्यातील उज्ज्वला धानजी यांनी लिहिलेला परशुराम देसाई यांच्याबद्दलचा हा लेख … त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.

सिंधुभूमीतील महामहोपाध्याय! डॉ. वा. वि. मिराशी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा सातवा लेख… सिंधुभूमीतील एकमेव महामहोपाध्याय डॉ. वा. वि. मिराशी यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे सुरेश ठाकूर यांनी…