डाळपस्वारीचे दिवस

आचरा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारी दर तीन वर्षांनी येते. यंदाची डाळपस्वारी २५ फेब्रुवारी ते दोन मार्च २०२१ या कालावधीत होणार आहे. यंदाच्या डाळपस्वारीवर करोनाचे सावट असले, तरी हा उत्सव नवे चैतन्य देणारा असतो. त्या निमित्ताने, डाळपस्वारी या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाबद्दल ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख…

चिपी विमानतळावरून १ मार्चपासून `उडान`

सिंधुदुर्गनगरी : चिपी (ता. मालवण) विमानतळावर काल (दि. ८ फेब्रुवारी) दोन विमाने यशस्वीपणे उतरली. त्यामुळे संबंधित कंपनीने उद्‌घाटनाचा कार्यक्रम १ मार्चला आयोजित केला आहे. खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मालवणच्या समुद्रात साकारला ४०० फूट लांब तिरंगा

एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणच्या दांडी समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ समुद्राच्या मध्यभागी जाऊन अंदाजे ४०० फूट लांब तिरंगा बनवून अनोखी सलामी दिली.

सप्तसूर म्युझिकल्स अभंग स्पर्धा प्राथमिक फेरी – रत्नागिरीतून तन्वी मोरे, सिंधुदुर्गातून महेंद्र मराठे प्रथम

रत्नागिरी : पावसचे श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि रत्नागिरीतील सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीमत संजीवनी गाथा’ राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल नुकताच जाहीर झाला.

सिंधुसाहित्यसरिता पुस्तकाचे सिंधुदुर्गात एकाच दिवशी ठिकठिकाणी अनोखे प्रकाशन

माणगाव आणि आचरा (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणाऱ्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाचे नुकतेच सिंधदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीने उद्घाटन झाले.

सिंधुसाहित्यसरिता – काठावरचेच ओठावर…!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारे ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक आज, देवदीपावलीच्या मुहूर्तावर प्रकाशित होत आहे. ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून उत्साही सदस्यांनी सिंधुसाहित्यसरिता अक्षरमंच नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘सिंधुसाहित्यसरिता’ लेखमाला करोना लॉकडाउनच्या कालावधीत प्रसिद्ध केली. त्या लेखमालेची सुधारित आवृत्ती सत्त्वश्री प्रकाशन अर्थात कोकण मीडियाने पुस्तक रूपात आणि ई-बुक रूपात प्रकाशित केली. (पुस्तक खरेदीची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे.) त्या निमित्ताने, पुस्तकाचे संपादक सुरेश ठाकूर आणि प्रकाशक प्रमोद कोनकर यांचे हे मनोगत…