प्रजासत्ताक दिनानिमित्त मालवणच्या समुद्रात साकारला ४०० फूट लांब तिरंगा

मालवण : एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणच्या दांडी समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ समुद्राच्या मध्यभागी जाऊन अंदाजे ४०० फूट लांब तिरंगा बनवून अनोखी सलामी दिली. निसर्गपूरक खाण्याचे रंग आणि मत्स्यखाद्य वापरून समुद्राच्या पृष्ठभागावर भारताचा तिरंगा तयार करण्यात आला. त्यासाठी तीन बोटींची मदत घेण्यात आली. कोणत्याही देशाचा ४०० फूट लांब ध्वज पाण्यामध्ये तयार करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा जयघोषाने मालवणचा समुद्रकिनारा दुमदुमून गेला होता. परदेशी हे सातारा जिल्ह्यातल्या लोणंदचे सुपुत्र असून, त्यांनी अनेक विक्रम केले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply