चिपी विमानतळावरून १ मार्चपासून `उडान`

सिंधुदुर्गनगरी : चिपी (ता. मालवण) विमानतळावर काल (दि. ८ फेब्रुवारी) दोन विमाने यशस्वीपणे उतरली. त्यामुळे संबंधित कंपनीने उद्‌घाटनाचा कार्यक्रम १ मार्चला आयोजित केला आहे. खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

खासदार राऊत म्हणाले, चिपी विमानतळाचा समावेश उडान योजनेत झाल्याने अडीच हजार रुपये तिकिटात मुंबईला जाणे शक्य होणार आहे. मुंबईतून येण्यासाठी दररोज सकाळी ११ वाजता विमान सुटेल. ते दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी परतीच्या प्रवासाला रवाना होईल. दररोज विमान सुटणार आहे. याशिवाय सुरत-अहमदाबाद-सिंधुदुर्ग वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे, असेही ते म्हणाले.

चिपी विमानतळासाठी लागणाऱ्या जागेच्या व्यतिरिक्त ९३७ हेक्टर जागेत कमर्शियल म्हणून पेन्सिल नोंद केली होती. आता सर्व्हे नंबर ३९ वगळून गावठाण जागेत ताज हॉटेल उभारले जात आहे, असेही यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply