करोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार

रत्नागिरी : करोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना २५ हजार ते दोन लाखापर्यंतचे सन्मान पुरस्कार रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. अशा तऱ्हेने पुरस्कार जाहीर करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे.

प्रशासनाच्या हतबलतेचा विपर्यस्त अर्थ

जिल्ह्याच्या सुरक्षेच्या बाबतीत नव्हे, तर परवान्यांविना मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांना थोपविण्याच्या बाबतीत असलेली हतबलता त्यांनी व्यक्त केली. मात्र अपेक्षेप्रमाणेच विपर्यस्त स्वरूपात त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि जिल्ह्याचे प्रशासन करोनाच्या बाबतीत हतबल झाले, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यातून वेगळा संदेश सर्वत्र गेला. करोनाचे संकट सुरू झाल्यापासून प्रशासनाने केलेली उत्तम कामगिरी या एका हतबलतेच्या बातम्यांमुळे पूर्णपणे झाकोळली गेली.

आठ मार्चनंतर पुण्या-मुंबईतून रत्नागिरीत आलेल्यांनी सक्तीने घरीच राहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी : मुंबई व पुणे शहरातून आठ मार्च २०२०नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या व्यक्तींनी राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Representational

रत्नागिरीसह जिल्ह्यातील नऊ शहरांत दुचाकीवरून एकट्यालाच जाता येणार

करोनाच्या प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी नागरी (शहरी) भागांसाठी आहे. रत्नागिरीसह खेड, चिपळूण आणि राजापूर, नगरपालिकांचे क्षेत्र, तसेच मंडणगड, दापोली, गुहागर, देवरूख आणि लांजा या नगरपंचायतीच्या क्षेत्रांमध्येही जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या सर्व शहरांमध्ये दुचाकीवरूनही एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. दुचाकीवर दुसरी व्यक्ती दिसली, तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला शिक्षा केली जाईल.