निसर्गाचं वर‘दान’ सांभाळू या!

अधिक (पुरुषोत्तम) मास सुरू आहे. भारतीय जीवनपद्धतीनुसार, या महिन्यात केलेल्या सत्पात्री दानाचं फळ शतपटीने अधिक मिळण्याची मान्यता आहे. इतर दानांप्रमाणे निसर्गाचं वर‘दान’रूपी सान्निध्यही मनुष्याला समाधान प्राप्त करून देतं. म्हणूनच निसर्ग सान्निध्याचा वसा आणि वारसा संवर्धित करून पुढील पिढीकडे जसाच्या तसा सुपूर्द करण्यासाठी मनुष्याने अधिक मासानिमित्ताने पावलं उचलायला हवीत. त्या निमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला हा लेख…

‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!!

करोनाचा पहिला फटका पर्यटनाला बसला. या धक्क्यातून सर्वांत शेवटी सावरणारा व्यवसायही पर्यटनच असेल. पृथ्वीवरील सर्वच ठिकाणे सुंदर होती. आपण त्या सौंदर्यांचे अभयारण्य, पार्क, कृषी पर्यटन आदी तुकडे पाडले. हे तुकडे नीट सांभाळण्याची जाणीव करोनाने करून दिली आहे. चला तर मग, आपण ‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!! रोजगार निर्मिती साधू या!!! आज (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिन. त्या निमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला हा लेख…

पेपरवाल्यांनाही बसले करोनाचे घाव…

करोना, लॉकडाउन, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी अशा संकटांनी पाठोपाठ सर्वांना तडाखे दिले. सर्वांना कसे फटके बसले, याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना, वृत्तपत्र व्यवसायाला, छोट्या साप्ताहिकांना मात्र किती फटका बसला आहे, यावर फारसं लिहिलं गेलं नाही. या प्रश्नाचा आढावा घेणारा, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख…

अनलॉक ४ : केंद्र सरकारच्या नव्या सूचना जारी

लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजेच ‘अनलॉक ४’च्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने आज (२९ ऑगस्ट) रात्री जाहीर केल्या. त्यानुसार, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्वीपेक्षा अधिक कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे; मात्र कंटेन्मेंट झोनमधील कडक निर्बंध सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरूच राहतील, असेही त्यात म्हटले आहे.

लॉकडाउनच्या काळात कोकणचा निसर्ग कुंचल्यातून उतरला कागदावर

पावसाळ्यात कोकणचा निसर्ग सर्वांनाच भुरळ पाडतो. पावसाच्या सरींनी सर्वत्र उगवणारे हिरवे अंकुर आणि शेतीच्या कामात मग्न असणारे शेतकरी कुटुंब असे सारे दृश्य नजरेचे पारणे फेडणारे असते. लॉकडाउनच्या काळात कोकणचा हा निसर्ग कलाशिक्षक विष्णू गोविंद परीट यांनी आपल्या कुंचल्यातून बहारदारपणे कागदावर उमटवलाय. परीट यांची चित्रे पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.

जिल्हावासीयांना कडक टाळेबंदी; बाहेरील नागरिकांना पायघड्या; आठ दिवसांत रत्नागिरीबाहेरून आले नऊ हजार नागरिक

रत्नागिरी : करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एक जुलैपासून कडक लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यात पुढेही वाढ करण्यात आली; मात्र या लॉकडाउनमध्ये जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही प्रवेश देण्यास बंदी घालण्याच्या स्वतःच्याच धोरणाचा प्रशासनाला विसर पडला आहे. या आठ दिवसांत जिल्ह्याबाहेरून तब्बल आठ हजार ९०२ नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत.