संस्मरणीय आणि आदर्श स्मृतिसोहळा

प्रथितयश लेखक जयवंत दळवी यांच्या स्मृतिशताब्दीचा नुकताच समारोप झाला. त्यांच्या आठवणी जपणारा कार्यक्रम त्यांचे मूळ गाव असलेल्या आरवली आणि परिसरात वर्षभर साजरा करण्यात आला. एखाद्या व्यक्तीची आठवण त्याच्या शंभराव्या वर्षात वर्षभर जपणारा असा एखादा कार्यक्रम अनोखाच आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ले या तालुक्यांमधील आरवलीच्या परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी वर्षभर दळवींच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. साहित्य प्रेरणा कट्टा ही आभासी संस्था आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे या शतकमहोत्सवी ग्रंथालयाने हा उपक्रम राबविला. साहित्य रसिक आणि हे साहित्य जतन करणारी, रसिकांना ते पुरविणारी ग्रंथालयासारखी संस्था विधायक हेतूने एकत्र आली की किती उत्तम आदर्श निर्माण होऊ शकतो, हेच या संस्थांनी दाखवून दिले आहे.

आमच्या नमशीचे भाऊमामा

आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक आणि ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचे मामा सदानंद काशिनाथ सामंत (नमस) यांना नुकतीच देवाज्ञा झाली. त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला, आजोळच्या समृद्ध आठवणी जागवणारा हा लेख…

माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक ९ (मठ येथील खानोलकर हायस्कूलचे जोशी सर)

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील नववा लेख आहे उज्ज्वला धानजी यांचा… मठ (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) येथील रायसाहेब डॉक्टर रा. धों. खानोलकर हायस्कूलचे रामकृष्ण पांडुरंग जोशी यांच्याबद्दलचा…

सिंधुदुर्गातील शेतकऱ्याने विकसित केली लाल भेंडी

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील अनंत प्रभू-आजगांवकर या प्रगतिशील शेतकऱ्याने लाल भेंडी ही भेंडीची नवीन जात विकसित केली आहे. त्या जातीचे अखिल भारतीय पातळीवरील चाचणी प्रयोग होऊन त्याचे संपूर्ण अधिकार प्रभू-आजगांवकर यांना देण्यात आले आहेत. या जातीच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये त्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.