रत्नागिरी : कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी सामाजिक सेवेसाठी शिक्षण क्षेत्र निवडले. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त, गुरफटलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी या दांपत्याने स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आणि र. ए. सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केले.