गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायण; १२५ जणांचा सहभाग

रत्नागिरी : गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीतील गीता भवनात आज (२२ डिसेंबर) सकाळी चार तास संपूर्ण श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण करण्यात आले. या पारायणात १२५हून अधिक महिला, पुरुष, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृत भारती या सहा संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

रत्नागिरीतील कीर्तनसंध्यामध्ये जानेवारीत “आले रामराज्य”

रत्नागिरी : येत्या १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात ययेणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात श्रोत्यांना अयोध्याधीश प्रभू श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र अनुभवायला मिळणार आहे.

संस्कृतमधील गीत, नाट्य, स्तोत्रांचा रंगतदार कार्यक्रम

रत्नागिरी : संस्कृतमधील स्तोत्रे, गीते, नाट्य आणि नृत्य या माध्यमातून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत दिन समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान

डोंबिवलीतील कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, तर ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजनोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवारी (२७ ऑगस्ट २०२३) सायंकाळी डोंबिवली (पश्चिम) येथील महात्मा फुले रस्त्यावरील मराठा हितवर्धक मंडळ हॉलमध्ये पार पडला.

डॉ. श्रीधर ठाकूर कोकणभूषण, प्रमोद कोनकर कोकणरत्न

डोंबिवली : येथील कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, तर ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे.

युवा महोत्सवामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालय चॅम्पियन

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या छप्पन्नाव्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात पुन्हा एकदा जिल्हा चॅम्पियनशिप मिळवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.