भक्तिरंगांत बहरली रत्नागिरीकरांची आषाढी एकादशीची संध्या…

रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या संध्याकाळी (२९ जून २०२३) युवा गायक अभिषेक काळे आणि गायिका सृष्टी कुलकर्णी यांच्या बहारदार आणि भक्तिरसपूर्ण गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तिरंग’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे यंदाचे नववे वर्ष होते.

कालिदासाच्या मेघदूताचे सध्याच्या हवामानातील साम्य तपासण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : अभ्यासक्रमात संस्कृत भाषा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकणे आवश्यक आहे, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटणकर यांना भाई वैद्य पुरस्कार

रत्नागिरी : येथील ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक बाळासाहेब पाटणकर यांना ज्ञान फाउंडेशनचा लोकनेते भाई वैद्य स्मृति गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २४ जून रोजी पुण्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

गोपुरी आश्रमात विद्यार्थ्यांना सुलेखनाचे धडे

कणकवली : येथील अप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी सुलेखनाचे धडे दिले.

माधव कदम यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार

पोंभुर्ले (ता. देवगड) : यावर्षीचा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.

बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथीनिमित्ताने कविसंमेलनातून अभिवादन

देवगड : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७७ व्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी पोंभुर्ले (ता. देवगड) येथे येत्या १७ मे रोजी कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.