सिंधुसाहित्यसरिता पुस्तकाचे सिंधुदुर्गात एकाच दिवशी ठिकठिकाणी अनोखे प्रकाशन

माणगाव आणि आचरा (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणाऱ्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाचे नुकतेच सिंधदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीने उद्घाटन झाले.

सिंधुसाहित्यसरिता – काठावरचेच ओठावर…!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारे ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक आज, देवदीपावलीच्या मुहूर्तावर प्रकाशित होत आहे. ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून उत्साही सदस्यांनी सिंधुसाहित्यसरिता अक्षरमंच नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘सिंधुसाहित्यसरिता’ लेखमाला करोना लॉकडाउनच्या कालावधीत प्रसिद्ध केली. त्या लेखमालेची सुधारित आवृत्ती सत्त्वश्री प्रकाशन अर्थात कोकण मीडियाने पुस्तक रूपात आणि ई-बुक रूपात प्रकाशित केली. (पुस्तक खरेदीची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे.) त्या निमित्ताने, पुस्तकाचे संपादक सुरेश ठाकूर आणि प्रकाशक प्रमोद कोनकर यांचे हे मनोगत…

सुरेश ठाकूर यांच्या ‘शतदा प्रेम करावे’ या पुस्तकाचे अभिवाचन; ‘कोमसाप-मालवण’चा ऑनलाइन उपक्रम

मालवण : सुरेश श्यामराव ठाकूर यांनी लिहिलेल्या ‘शतदा प्रेम करावे’ या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन करण्याचा उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुरू झाला आहे. सुरेश ठाकूर हे आचरा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील ज्येष्ठ लेखक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आहेत. हा उपक्रम नऊ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, दर सोमवार,बुधवार आणि शुक्रवारी सायंकाळी सात वाजता अभिवाचन सादर होत आहे.

‘कोमसाप’च्या मालवण शाखेने केली ‘पुलं गौरवगीता’ची निर्मिती

मालवण : पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. लेखन, संगीत, नाट्य अशा विविध क्षेत्रांत विपुल आणि दर्जेदार निर्मिती केलेल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या गौरवासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘पुलं गौरवगीता’ची निर्मिती केली आहे. पाच नोव्हेंबर अर्थात मराठी रंगभूमी दिनी या गीताच्या चित्रफितीचे उद्घाटन ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाइन सोहळ्यात झाले.

माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १७ (आचरे केंद्रशाळेतील ठाकूर गुरुजी)

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १७वा लेख आहे मंदार सांबारी यांचा… आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बा. ना. बिडये विद्यालय केंद्रशाळेतील शिक्षक सुरेश श्यामराव ठाकूर यांच्याविषयीचा…

माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक ४ (आचरे केंद्रशाळेतील ठाकूर गुरुजी)

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील चौथा लेख आहे सुगंधा केदार गुरव यांचा… आचरे (मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बा. ना. बिडये विद्यालय केंद्रशाळेतील शिक्षक सुरेश श्यामराव ठाकूर यांच्याविषयीचा…