स्थलांतर रोखणाऱ्याही नोकऱ्या हव्यात

कोकणात कोकणाचे प्रश्न असतील, तसेच विदर्भात विदर्भाचे म्हणून काही प्रश्न असतील, मराठवाड्याचेही काही प्रश्न असतील. सर्वच ठिकाणी स्थानिक उद्योगांना, लघुउद्योगांना गरज असलेल्या तरुणांची उपलब्धता करून देण्यासाठीही उद्योग विभागाने तसे अभियान राबवायला हवे. मोठ्या उद्योगांप्रमाणेच या छोट्या उद्योगांनाही कामगार-कर्मचाऱ्यांची गरज असते. ती स्थानिक स्वरूपातच भागविली गेली, तर स्थलांतर रोखले जाईलच, पण त्याचबरोबर त्या त्या स्थानिक उद्योगांची आणि पर्यायाने त्या विभागाचीही भरभराट होईल. हा समन्वय साधला जाणे आवश्यक आहे.

दिशाभूल करणाऱ्या सूचना

अनेक खाद्यपदार्थांच्या जाहिरातीही दिशाभूल करणाऱ्याच असतात. जाहिरात करणाऱ्या व्यक्तींनी एखादे उत्पादन किंवा सेवा वापरली किंवा अनुभवली नसेल तर त्यांनी त्याचे समर्थन करता कामा नये, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात जाहिरातीतील हीरो कोणत्या वस्तू वापरतात? एकंदरीत जाहिरातींना वेसण घालण्यासाठी जारी केलेल्या सूचनाच मुळात दिशाभूल करणाऱ्या आहेत.

सोशल मीडियावर रंगले पाचवे ‘कानसेन’ संमेलन

रत्नागिरी : सोशल मीडियाद्वारे राज्यभरातील विविध प्रांतांतून एकत्र आलेल्या ‘कानसेनां’नी सलग चार वर्षे रत्नागिरीत प्रत्यक्ष स्नेहसंमेलन साजरे केले; मात्र या वर्षीच्या अभूतपूर्व परिस्थितीत प्रत्यक्ष संमेलन घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे संमेलन आयोजित करण्यात आले आणि ते यशस्वीपणे साजरे झाले. संमेलनाला यंदा व्यापक स्वरूप मिळाले. सलग दहा दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.

‘कानसेन’ ग्रुपचे पाचवे स्नेहसंमेलन सोशल मीडियाद्वारे सुरू; दहा दिवसांचे भरगच्च कार्यक्रम

रत्नागिरी : ‘कानसेन’ हा संगीतप्रेमींचा ग्रुप तयार झाला आणि बघता बघता पाच वर्षे पूर्ण झाली. गेली चार वर्षे यजमान रत्नागिरीकरांच्या पाहुणचारात हे संमेलन लाइव्ह स्वरूपात पार पडले; मात्र या वर्षी करोनाचे सावट असल्यामुळे सोशल मीडियाद्वारे सारे जण एकत्र आले आणि संमेलनाला अधिकच व्यापक स्वरूप प्राप्त झाले.