घरोघरी तिरंगा अभियान जनजागृतीसाठी रत्नागिरीत रविवारी सायकल फेरी

रत्नागिरी : घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी येत्या रविवारी (दि. ७ ऑगस्ट) रत्नागिरीत सायकल फेरी निघणार आहे. सकाळी ८ वाजता जयस्तंभ येथून फेरी सुरू होईल.

भारतीय ध्वजसंहिता – २००६

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जाणार आहे. त्या निमित्ताने, भारतीय ध्वजसंहिता येथे प्रसिद्ध करत आहोत. तिरंगा फडकवताना या संहितेत दिलेले मुद्दे आवर्जून लक्षात ठेवावेत आणि भारतीय तिरंगा ध्वजाचा मान राखावा.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने स्वराज्यभूमी कोकण यात्रा

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने कोकणातील ऐतिहासिक सर्व प्रमुख गावांना भेट आणि जनजागृती सभा, देशाचे नेतृत्व करणाऱ्या कोकणातील व्यक्तिमत्त्वांना अभिवादन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वराज्य कोकण यात्रा निघणार आहे.*

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने विविध उपक्रम, स्पर्धा, सायकल फेरी, सवलतींचे सूतोवाच

रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने येथील जनजागृती संघातर्फे घरोघरी तिरंगा मोहिमेसह रत्नागिरीत सायकल फेरी, फोटोग्राफी स्पर्धेसह विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

मी भारतीय दीर्घांकाचे आजपासून रत्नागिरी जिल्ह्यात प्रयोग

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या मी भारतीय या दीर्घांकाची अमृतमहोत्सवी प्रयोगाकडे वाटचाल सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या दीर्घांकाचे आजपासून विविध ठिकाणी प्रयोग होणार आहेत.

‘जरा याद उन्हे भी कर लो’ खुली अखिल भारतीय चित्रकला स्पर्धा

पुणे : भारताच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या स्मृती चित्रांमधून जागविण्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोळा लाखांपर्यंतची बक्षिसे असलेली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. चित्रकारांना १ ऑगस्ट २०२२ पर्यंत चित्रे पाठवता येणार आहेत.