घरोघरी तिरंगा अभियान जनजागृतीसाठी रत्नागिरीत रविवारी सायकल फेरी

रत्नागिरी : घरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी येत्या रविवारी (दि. ७ ऑगस्ट) रत्नागिरीत सायकल फेरी निघणार आहे. सकाळी ८ वाजता जयस्तंभ येथून फेरी सुरू होईल. रत्नागिरी जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने ही फेरी काढण्यात येणार असून फेरीच्या नावनोंदणीसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.

जयस्तंभ, गोगटे कॉलेज, जेल रोड सिग्नल, सिव्हिल हॉस्पिटल, एसटी स्टॅण्ड, राम आळी, पतितपावन मंदिर, जोशी पाळंद, टिळक आळी, आठवडा बाजार आणि पुन्हा जयस्तंभ असा फेरीचा मार्ग आहे. जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारीसुद्धा सायकल फेरीमध्ये सहभागी होणार आहेत.

फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी वेळेत उपस्थित असलेल्या पहिल्या ७५ सायकलप्रेमींना हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत घरी लावण्यासाठी तिरंगा देण्यात येणार आहे. सायकलपटूंनी येताना एक लिटर पाण्याची बाटली आणि तिरंगा घरी नेण्यासाठी सॅक, पिशवी सोबत बाळगावी. १४ वर्षांखालील मुलांच्या बरोबर त्यांचे पालक असणे गरजेचे आहे. फेरीदरम्यान पाण्याची आणि फेरी संपल्यावर अल्पोपाहाराची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. यामध्ये लायन्स क्लबतर्फे हायड्रेशन पॉइंटवरून एनर्जी ड्रिंक देण्यात येणार आहे. सुरस प्रॉडक्ट्सचे रश्मीन दुर्वे पतितपावन मंदिर येथे हायड्रेशन पॉइंटची व्यवस्था करणार आहेत.

शाळा, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी आणि इतर सायकलप्रेमींनी घरोघरी तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून या फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

फेरीच्या अधिक माहितीसाठी प्रसाद देवस्थळी (7021454253), दर्शन जाधव (9970398242) किंवा ओंकार फडके (9422050762) यांच्याशी संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply