स्वामी स्वरूपानंद संस्थेची कर्जवसुली सलग १७ वर्षे ९९ टक्क्यांपेक्षा अधिक

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आठ कोटी ३२ लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. पतसंस्थेची भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) २८.७० टक्के असून, राज्यातील १५ हजार संस्थांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असेल. तसेच, सलग १७ वर्षे कर्जवसुलीचे प्रमाण ९९ टक्क्यांच्या वर राखण्यातही संस्था यशस्वी झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी आज (३१ मार्च) संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी ताळेबंद मांडण्याचा आपला पायंडा पतसंस्थेने यंदाही कायम राखला.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेतील ठेवी ३२३ कोटीवर

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने२० जून ते २० जुलै या ठेववृद्धी मासाच्या अखेरच्या दिवशी १ कोटी १६ लाखाच्या ठेवी जमा झाल्या असून पतसंस्थेकडील एकूण ठेवी ३२३ कोटीवर गेल्या आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला सात कोटीचा निव्वळ नफा : ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासात १५ कोटी ठेव संकलनाचे उद्दिष्ट दोन दिवस शिल्लक असतानाच पूर्ण झाले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

राज्य पतसंस्था फेडरेशनवर दीपक पटवर्धन बिनविरोध

रत्नागिरी : राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली. श्री. पटवर्धन यांच्या या निवडीबद्दल जिल्हा बँकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.