विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : २०२६

राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २०२६-२७चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. त्यातील महत्त्वाचे मुद्दे :

फेरबदलासह राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; अजित पवार अर्थमंत्री, तर वळसे-पाटील सहकारमंत्री

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ जुलै २०२३) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण (11 मार्च 2022)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 11 मार्च 2022 रोजी 2022-23 या वर्षासाठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. त्यांचे हे अर्थसंकल्पीय भाषण –

‘टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी हवी; पण शेतकरीहितासाठी सध्याचे नियम जाचक’

वाइन उत्पादनाचे नियम आणि निकष केवळ बड्या उद्योजकांना अनुकूल ठरतील असेच आहेत. केवळ द्राक्षांपासूनच नव्हे, तर अनेक फळांपासून वाइन करता येते. वाइननिर्मितीची ही प्रक्रिया कोणताही छोटा शेतकरी किंवा उत्पादक घरच्या घरी करू शकतो; मात्र सरकारचे सध्याचे नियम त्याला तशी परवानगी देत नाहीत, असा दावा या विषयात अनेक यशस्वी प्रयोग केलेले दापोलीतील उद्योजक माधव महाजन यांनी केला आहे. वाइन म्हणजे दारू नव्हे, तर ते पोषणमूल्य असलेले पेय असल्याने अगदी चहा टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी मिळायला हवी, असेही त्यांचे म्हणणे आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना तीन वर्षांत ३०० कोटीचा निधी

मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता येत्या तीन वर्षांत दरवर्षी शंभर कोटींप्रमाणे ३०० कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत केली.

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात ६० टक्के कपात : अजित पवार

मुंबई : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या आमदारांसह शासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधिमंडळाचे सर्व सदस्य, तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करून त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.