रत्नागिरी-सिंधुर्गात करोनाचा उद्रेक, सिंधुदुर्गच्या दुपटीहून अधिक रुग्ण रत्नागिरीत

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत आज (२७ मार्च) करोनाचा उद्रेक झाला. सिंधुदुर्गात ५७ तर त्याच्या दुपटीहून अधिक म्हणजे ११६ रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले.

संपूर्ण महाराष्ट्रात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी

मुंबई : राज्यात करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात रविवार, २८ मार्च २०२१च्या रात्रीपासून जमावबंदी (Night Curfew) लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.

रत्नागिरीत करोनाबाधितांच्या संख्येत तिसऱ्या दिवशीही वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ मार्च) सलग तिसऱ्या दिवशी नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. आज नवे ६२ रुग्ण आढळले, तर केवळ १२ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज नवे २८ रुग्ण आढळले, तर केवळ ५ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीत ६४, तर सिंधुदुर्गात ४७ नवे करोनाबाधित

रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ मार्च) पुन्हा एकदा नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. आज नवे ६४ रुग्ण आढळले, तर १७ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज नवे ४७ रुग्ण आढळले, तर केवळ आठ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात २० हून अधिक नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ मार्च) पुन्हा एकदा नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. आज नवे २८ रुग्ण आढळले, तर १९ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गातही आज नवे २४ रुग्ण आढळले.

रत्नागिरीत करोनाबाधितांच्या संख्येत घट, सिंधुदुर्गात २४ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपेक्षा आज (२३ मार्च) नव्या करोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच घट नोंदविली गेली. आज नवे ७ रुग्ण आढळले, तर २८ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात २४ नवे रुग्ण आढळले, ११ करोनामुक्त झाले, तर एकाचा मृत्यू नोंदविला गेला.