रत्नागिरी-सिंधुर्गात करोनाचा उद्रेक, सिंधुदुर्गच्या दुपटीहून अधिक रुग्ण रत्नागिरीत

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत आज (२७ मार्च) करोनाचा उद्रेक झाला. सिंधुदुर्गात ५७ तर त्याच्या दुपटीहून अधिक म्हणजे ११६ रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १६, दापोली, खेड, संगमेश्वर प्रत्येकी ७, चिपळूण २४, मंडणगड ५, लांजा १, राजापूर ४ (एकूण ८२). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २७, दापोली १, गुहागर २, चिपळूण ४ (एकूण ३४). (दोन्ही मिळून ११६). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ७३३ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ६९३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९७ हजार २५७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३३४ आहे. त्यातील सर्वाधिक ९६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून १७६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ४० जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ९५१ झाली आहे. करोनामुक्तीचा दर घटून ९२.७१ टक्के झाला आहे.

आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. चिपळूण येथील ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू आज नोंदविला गेला. त्यामुळे मृतांची संख्या ३७२ झाली असून मृत्युदर ३.४६ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात आज (२७ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज ५७ नवे रुग्ण आढळले, तर केवळ ५ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या ६ हजार ९०३, तर करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार ३९४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १८१ झाली असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply